Sunday, March 30, 2008

आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटत

आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥

कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥

कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥

कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥

दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥

असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥

1 comment:

रुचिरा said...

कविता अतिशय सुन्दर आहे. हि कविता वाचुन मला माझ्या आई ची आठवण आली.