Thursday, November 1, 2007

एक धागा सुखाचा

एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे

पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा
कपड्यासाठी करिसी नाटक , तीन प्रवेशांचे

मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची
जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे !

या वस्त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकऱ्याचे !


गीत : ग.दि.माडगूळकर















No comments: