Wednesday, January 2, 2008

आठवतय ? तळ्याकाठी...

आठवतय ? तळ्याकाठी...
मी तुझी वाट पहात बसायचो ?
खरच त्या वेळी...
मी माझाच नसायचो !

छोटे दगड... खडे घेऊन...
भिरकावायचो मी पाण्यात,
अस्सेच....अगदी अस्सेच तरंग,
विचारांचे, उमटायचे माझ्या मनात !

बबलगम फुगवत खायचो...
तर कधी घ्यायचो... चणे-दाणे...
पाळलेल्या कबुतरांचे...
न्याहाळायचो...येणे जाणे !

कदाचित आत्ता...दिसशील तू..
अगदी गोड् हसशिल तू..
"sorry i m late "म्हणताना...
कान 'माझेच' धरशील तू,

अंधाराचे दूत..
सावली होऊन धावायचे,
"संपत आलीये संध्याकाळ"...
गुणगुणत डास चावायचे !

मग माझं तिथून उठणं..
आळस देत्... सटकणं,
jeans ला लागलेली माती...
शांत पणे झटकणं !

तू 'माझी' राहिली नाहीस...
ते तळं तरी कुठे उरलय आता ?
पण आजही कबुतरांना,
खाणं टाकतो मी, जात येता !

3 comments:

Unknown said...

जबरदस्त मीत्रा खुप छान आहे

Unknown said...
This comment has been removed by the author.
Unknown said...
This comment has been removed by the author.