तहानेलेला वाटसरु मी
अंगणी तुझ्या विसावलेलो
क्षणभराच्या तुझ्या सोबतीने
भरऊन्हात मी सुखावलेलो
तुझ्या नजरेच्या स्पर्शाने
मन माझे शहारलेले
साथ मी मागताच तुला
ओठ तुझे थरारलेले
अधांतरीचे उत्तर तुझे
दुरवर नक्षात्रांत गेले
नकाराच्या एका शब्दाने
अंगण सारे शांत केले
मागे फ़िरण्यास माझी
जड झाली पावले
लाजणारे ते आधीचे
डोळॆ तुझे पाणावले
मागे वळत्या पावलांचा
आवाज तुझ्या हुंदक्यात विरला
पाठ फ़िरताच माझ्याही डोळ्यांनी
बरसुन मुका आकांत केला
"न लागो तुझ्या आयुष्यास
आंच माझ्या आसवांची
जन्मभरी तु सुखात रहावे"
शब्दभेट ही या पांथस्थाची.......
Friday, December 28, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment