Thursday, January 17, 2008

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी
मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

स्वर - सुरेश वाडकर

Thursday, January 3, 2008

आपल्याला पण एक मैत्रिण असावी !

आपल्याला पण एक मैत्रिण असावी !
समोर आलॊ की थोडीशी हड्बडावी
बोलली नाही तरी आपल्याकडे बघून गोड हसावी
चालता चालताच पाठून तिनं हाक मारावी
घर जवळ येताच पुढे निघून जावी
आपण नसलॊ की थोडीशी हिरमूसावी
दिसलो की गालवर छान खळी पडावी
कधी हसता हसताच ती रडावी
कधी रडता रडताच खुद्कन हसावी
हक्काने आपल्यावर रागवावी
मग कही बोलताच निघून जावी
नंतर चूक कळल्यावर नुसता मिसकॉल द्यावी
आपण कॉल केल्यावर मात्र मुद्दाम तो कट् करावी
सकाळी भेटल्यावर हीचकीचत बोलावी
निरागस चेहऱ्याने मग माफ़ी मागावी
लेक्चर ला नसलो तर तिने प्रेसेन्टी लावावी
वाढदीवसाच्या पार्टीला मात्र नेहमी अबसेन्ट असावी
ती आनंदात असली की घडघडुन बोलावी
नाहीतर थोडीशी अबॊल रहावी
सुखात सगळ्यांना सामिल करावी
व्यथा फक्त माझ्याकडेच बोलावी
बाहेरगावी कुठे गेलो तर तिची आठवण यावी
आठवण काढताच तिला मात्र उचकी लागावी
परत आल्यावर हसतानाही डोळ्यात पाणी भरावी
"
साधा एक फोनही केला नाही !" म्हणत रुसुन बसावी
थोडा वेळ मग ती शांत रहावी
पुढच्याच क्षणाला " माझ्यासाठी काय़ आणले ?" म्हणुन विचारावी
ती बरोबर असली की आधार वाटावी
आपल्याला पण एक मैत्रिण असावी

Wednesday, January 2, 2008

आठवतय ? तळ्याकाठी...

आठवतय ? तळ्याकाठी...
मी तुझी वाट पहात बसायचो ?
खरच त्या वेळी...
मी माझाच नसायचो !

छोटे दगड... खडे घेऊन...
भिरकावायचो मी पाण्यात,
अस्सेच....अगदी अस्सेच तरंग,
विचारांचे, उमटायचे माझ्या मनात !

बबलगम फुगवत खायचो...
तर कधी घ्यायचो... चणे-दाणे...
पाळलेल्या कबुतरांचे...
न्याहाळायचो...येणे जाणे !

कदाचित आत्ता...दिसशील तू..
अगदी गोड् हसशिल तू..
"sorry i m late "म्हणताना...
कान 'माझेच' धरशील तू,

अंधाराचे दूत..
सावली होऊन धावायचे,
"संपत आलीये संध्याकाळ"...
गुणगुणत डास चावायचे !

मग माझं तिथून उठणं..
आळस देत्... सटकणं,
jeans ला लागलेली माती...
शांत पणे झटकणं !

तू 'माझी' राहिली नाहीस...
ते तळं तरी कुठे उरलय आता ?
पण आजही कबुतरांना,
खाणं टाकतो मी, जात येता !

लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदा तरी पहायच होत

लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदा तरी पहायच होत
वधूचं ते सुन्दर रुप मनामध्धे जपायचं होत
जिथे असशील तिथे सुखि रहा एवढच फक्त सांगायचं होत!!

आयुष्यातले चार क्षण सोबत आपन जगलो होतो
कधी हसत कधी रडत सोबत आपण चाललो होतो
ते क्षण आता विसरूण जा एवढच फक्त सांगायच होत
लग्नाच्या त्या मांडवत तुला एकदा तरी पहायच होत!!

आठवतं का? झाडाखाली रोज आपन भेटायचो
आयूष्याचे सुन्दर स्वप्न सोबत आपन रंगवायचो
ते स्वप्न सगळे पुसून टाक एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

आठवतका तुला तू नेहमीच रुसायचीस
मी विनोद करताच खळखळून हसयचीस्
अस रुसनं आता सोडुन दे एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

नेहमीच प्रेमाने तू राजा माला म्हनायचीस
आपण दोघे राजा राणी हेच गीत गायचीस्
हा राजा आता वीसरुन जा एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

भेट्लो नाहीं तुला तर दिवसभर रडायचीस्
रडतना सुद्धा तू कीती सुन्दर दीसायचीस
असं रडन आता सोडून दे एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

समूद्राकाठी फिरन्याचा नेहेमीच हट्ट करायचीस
किनार्यावर रेतीमध्धे लहान होवून खेळायचीस्
असे हट्ट आता सोडून दे एवढच फक्त सांगायच होतं
लग्नाच्या त्या मांडवात तुला एकदातरी पहायंच होतं!!

खांद्यावरती डोक थेवून तासन तास बसायचीस्
माझ्याकडे बघून मग लटकच हसायचीस
ते क्षण आता विसरूण जा एवढच फक्त सांगायचं होत
लग्नाच्या त्या मांडवत तुला एकदा तरी पहायच होत!!

आज तू पत्नी झालीस उद्या तू आई होशील
हळूहळू नवी नाती आता तू गुंफ़त जाशील
संसारात स्वत:ला रमवून घे एवढच फक्त सांगायचं होत
लग्नाच्या त्या मांडवत तुला एकदा तरी पहायच होत!!