Wednesday, April 30, 2008

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

आठवण माझी कधीतरी येईलच तुला

आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही हात तुझे जुळवुन ठेव तु.
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे.
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल........................!
माझ्या आठवणी एखदयाला सांगताना तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता नीट वापर त्याला,
अडखळलेला तो शब्द मीच असेल................!
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला त्याच्या तेजाला तु निखरत राहशील,
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल....................!
कधी जर सुटला बेधुंद गार वारा.
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील.
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक.,
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल..............!
आठवण माझी कधीतरी येईलच तुला

Sunday, April 27, 2008

म्हणुन आम्हाला प्रेम...

मनातले शब्द मनातच राहून गेले...
तीला बोलावलं भेटायला, ठरवलं सारे सांगून टाकायचे,
पण ती आली मैत्रिणी सोबत, अन काही बोलताच नाही आले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
हिम्मत साठवली आणि केले तीला SMS,
पण अर्धवटच वाचून ते Delete तीने केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
लिहित बसलो रात्रभर, वाटल सांगावं कवितेतून तीला सारं,
पण ती समोर येता सारे शब्दच विसरून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
भेटली एकटी बस-स्टॉपवर ती, वाटलं संधी चांगली आहे,
पण अचनक तिने "हा माझा बॉय-फ्रेंड" असे इंट्रोड्युस "त्याला" केले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
तरी वाटलं डोळ्यातले अश्रू सांगतील तिला सारं,
पण ती येई पर्यंत ते ही पावसाच्या पाण्यात वाहून गेले,
आणि पुन्हा एकदा, मनातले शब्द मनातच राहून गेले...
आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि.....

कितिही सुंदर मुलगी दिसली तरी,
तीचि स्तुति करुन तिला
हरबरयाच्या झाडावर चढ्वायला
आम्हाला कधि जमलेच नाहि ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम...

कोणाच्या मागे शिट्ट्यामारत फिरन
आमच्या तत्वात कधि बसलेच नाहि ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाहि..

तिच माझ नात...

भरलेल आभाळ रात्रभर गळल होत
तिच माझ नात फ़क्त पावसालाच कळल होत

रात्र भर पाउस थेंब अन थेंब सांडुन गेला
तिच्या माझ्या आठवणीवर ओलावा मांडून गेला
भिजण्यासाठी मग मन माझं वळल होत

तिच माझ नात फ़क्त पावसालाच कळल होत

ती रात्र पावसाने भिजवून काढली होती
मग वीजही कडाडून मांडली होती
भर पावसात माझं आभाळ जळल होत

तिच माझ नात फ़क्त पावसालाच कळल होत
-- योगेश

Friday, April 25, 2008

आठवण आली तुझी की

आठवण आली तुझी की,
नकळत डोळ्यांत पाणी येतं..
मग आठवतात ते दिवस
जिथं आपली ओळख झाली..

आठवण आली तुझी की,
माझं मन कासावीस होतं
मग त्याच आठवणींना..
मनात घोळवावं लागतं..

आठवण आली तुझी की,
वाटतं एकदाच तुला पाहावं
अन माझ्या हृदयात सामावून घ्यावं..
पण सलतं मनात ते दुःख..
जाणवतं आहे ते अशक्य...

कारण देवानेच नेलंय माझं ते सौख्य...
पण तरीही.........

आठवण आली तुझी की,
देवालाच मागतो मी....
नाही जमलं जे या जन्मी
मिळू देत ते पुढच्या जन्मी

Thursday, April 24, 2008

माहित आहे मला...

तुझ्या असण्यामुळं
जगणं थोडं सुसह्य झालंय
तुझ्यामुळं मला हक्काचं
विसाव्याचं स्थान मिळालंय...

माहित आहे मला...

वादळ थोपवायला
तूही असमर्थ आहेस नि मी ही
पण वादळं झेलण्याचं नि पेलण्याचं
तुझ्यामुळंच मला सामर्थ्य मिळालंय...

माहित आहे मला...

या भरकटलेल्या गलबताला
तू दिशा नाही दाखवू शकत
पण नांगर टाकून स्थिर होण्यासाठी
तुझ्यारुपी एक बेट मिळालंय...

माहित आहे मला...

घाव घालणारे घाव घालतच जाणार
तुकडे तुकडे होतच राहणार
घातलेले टाके उसवतच राहणार
धबधब्यासारखं जन्मभर कोसळतच राहणार...

पण यातून सावरण्यासाठी
मला तुझं दान मिळालंय
तुझ्या असण्यामुळं
जगणं थोडं सुसह्य झालंय...

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा
म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही पावसाळा
तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं
एखादं जाळीदार पान....

जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं
तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं
तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर वाटेल...
तशी वाट सापडेल जगण्याची...

पण...हातात माझ्या हक्काच असं काही नसेल
मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता सांभाळायला हवा
मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला हवा
येणारे येतात अन जाणारे जातातही...
मैत्रि सगळ्यांशीच होत नाही
मैत्रि सहज होवुन जाते ...
करायची ठरवली तरी ती करता येत नाही
तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...
म्हणुनच वाटतं......तुझ्या माझ्या मैत्रिला भय नाही
मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव
तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन ठेव
उद्या जर नसलोच तुझ्यासोबत मी तरी माझे शब्द असतील

तू हसत रहा माझ्यासाठी......
तुला बघुन माझे शब्दही हसतील
शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि
मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात एवढीच देऊ शकतो तुला खात्री........

Wednesday, April 23, 2008

ही अशी एक भावना...!

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्रुदय कधी
जोडताना असह्य वेदना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकीही येऊ नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बन्द व्हावे

स्वप्नात कुणाला असेहि बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहिच नसावे

कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपनास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदि आपण त्याची वाट बघावी
आणि त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दीशाहीन व्हावी

कुणाचे इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठांतुनही मग
त्याच्याच शब्दांचा ऊच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अश्रु जमावेत

कुणाला इतकीही माझी म्हनू नये
की त्याचे मीपण आपन विसरून जावे
त्या संभ्रमात त्याने आपल्याला
ठेच देऊन जागे करावे

पण.........
कुणाच्या इतक्याही दूर जाऊ नये
की आपल्या सावलीशिवाय सोबत काहीच नसावे

Monday, April 21, 2008

काही पुल विशेष..!

पुल - काही सहित्यिक भोग

स्थळ - पुणे शहरातील एक बस-स्टॉप
पात्रे - ‘खडूस’ ह्या शब्दाखेरीज दुसरा कुठला शब्द सुचु नये असे सत्तरीतले एक गृहस्थ.
मी त्यांच्या बाजूस जाऊन रांग लावतो. आश्चर्य म्हणजे रांग नाही. आम्ही दोघेच. काही वेळ ते गॄहस्थ आम्हाला खालपासून वरपर्यंत न्याहाळतात. आम्ही समोरच्या करंडे टेलर्सचे मि. करांडे एका लठ्ठ गॄहस्थाच्या पोटाचे माप घेत असल्याचे सुखद दृष्य पाहण्याचा बहाणा करतो. इतक्यात कानावर आवाज.

मी उपाख्य गाजी गणेश जोशी. दशभुजा गणपतीचे देऊळ कुठे आहे?
मी. काही कल्पना नाही बुवा.
गा.ग.जो. पुण्यातच राहता ना? (त्यावरून ते पुण्यात राहतात हे लक्षात आले.)
मी. हो.
गा.ग.जो. किती वर्षे?
मी. बरीच.
गा.ग.जो. व्यवसाय?
मी. पुस्तकं वगैरे लिहितो.
गा.ग.जो. म्हणजे साहित्यिक! आणि तरी तुम्हाला साधा दशभुजा गणपती ठाऊक नाही.
मी. आपण कुठल्या गावचे?
गा.ग.जो. मी कशाला कुठल्या गावाहून येतोय. इथच जगलो इथंच मरणार.
मी. (कधी? हा प्रश्न गाळून) इथेच मरणार कशावरून.
गा.ग.जो. दशभुजा गणपती ठौक नाही ते सरळ सांगा. माझ्या मरणाची कशाला काळजी करताय? मी मेल्यावर काही तुम्हाला खांद्याला बोलावणार नाही.
मी. खांद्याची आमंत्रणं मृतांच्या सहीनं कधी जाऊ लागली?
गा.ग.जो. हे पहा! तुम्ही साहित्यिक आसल्याने भाषाप्रभुत्त्व हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे असे मानू नका. मीही पुण्याचाच आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. पुण्यात राहून साहित्यिक म्हणवणाऱ्या माणसाला दशभुजा गणपतीचे मंदिर ठाऊक नाही ती तुमची समाजाविषयीची आस्था. उद्या शनिवारवाडा कुठे असतो विचाराल. परवा पर्वतीचा पत्ता पुसाल.
मी. तुम्हाल तरी ठाऊक आहे का दशभुजा गणपती?
गा.ग.जो. हो आहे मग.
मी. मग कशाला विचारताय?
गा.ग.जो. तुम्हाला माहित आहे का नाही हे पडताळायला.
मी. पण माझा दशभुजा गणपतीशी काय संबंध?
गा.ग.जो. सांगतो. ‘पुणे शहरातील ढासळती धर्मव्यवस्था’ ह्या विषयावर लेखनमाला लिहितोय मी. इथं सकाळी सात पासून उभा अहे. बेचाळीस लोकांत फक्त एक दशभुजा गणपती ठाऊक असणारा निघाला. ते पण त्याचे दुकान आहे मंदिरासमोर म्हणून. आत कधी दर्शनाला गेला नाही म्हणे.
मी. म्हणजे दशभुजा गणपती पत्त्यापुरता.
गा.ग.जो. अहो हीच तर आपली ट्रॅजेडी. देव फक्त . एकदा आम्ही विचारलं ‘डॉ. मंजुळाबाई सपाते प्रसूतिगृह ’ कुठी आहे? तर तो गृहस्थ म्हणाला, ‘सोमण मारुतिच्या देवळापुढे’. अरे काही सारासारविवेकबुद्धी? निदान प्रसूतिसाठी तरी मारुती वापरू नका.
मी. खरं आहे.
गा.ग.जो. साहित्यिक म्हणून देवळात जाणं तुम्ही आपलं कर्तव्य मानत नाही तर!
मी. (देवावर भार घालून) मानतो तर!
गा.ग.जो. मग जाता का?
मी. दशभुजाला नाही जात.
गा.ग.जो. आय एम नाट पर्टिक्युलर अबाऊट धिस गणपती ऍट ऑल. (रिटायर म्हातारा भडकला की पुण्याच्या इंग्रजीत फुटतो). एनी टेम्पल फॉर द्याट म्याटर. रोज जाता?
मी. (देवा क्षमा कर. खोटं बोलू नये ह्या गांधीवचनाला मी शाळेत कंपासपेटीत लपवलेलं. ती कंपासपेटी नववीच्या घटक चाचणीत हरवली.) हो म्हणजे रोज म्हणायला हरकत नाही.
गा.ग.जो. मला होय किंवा नाहीचा रकाना भरायचाय.
मी. हो! (फर्गिव मी ओह लॉर्ड! पण तसं हे खोटं नाही हा. रोज रात्री गुडकुले विठूबाच्या देवळात काणे भटजी, दाजीबा टेलर, सोपानराव न्हावी सॉरी हेयरड्रेसर... म्याट्रिक केलेला न्हावी ना म्हणून... आणि मी वरच्या नगारखान्यात रमी खेळतो. एक पैसा शंभर प्वाईंट. मागल्या आषाढी कार्तिकीला गल्ला जास्त जमला नाही म्हणून जिंकाणारा काणे भटजी प्वाईंट वाढवा म्हणाला. आम्ही ऎकत नाही.)
गा.ग.जो. सरळ हो सांगा ना.
मी. हो. आता धर्मावर श्रद्धा नाही ठेवायची ती काय म्युनिसिपाल्टी, जिल्हाबोर्डवाले अन महाराष्ट्र महामंडळ परिवहनाच्या एस.टीं.वर ठेवायची?
गा.ग.जो. वाक्याशेवटी प्रशन्चिन्ह नको. पूर्णविराम द्या हो.
मी. (मुकाट्याने) हो.
गा.ग.जो. आता सांगा धर्मावर तुमची श्रद्धा आहे?
मी. यथेच्छ आहे. धर्म नसता तर दसरा दिवाळी नारळी पौर्णिमा नसत्या, पुरणपोळी, लाडू नसते. इतकच काय सत्यनारायण नसता तर शेराला सव्वाशेर चाचपत तुपाचा शीरा खायला मिळाला नसता.
गा.ग.जो. तो शीरा नसतो. प्रसाद असतो.
मी. सत्यानारायणाला खारीक वाटता येणारा नाहीत. प्रसाद म्हणूनसुद्धा. माफ करा पण तुम्ही छुपे कम्युनिस्ट दिसता. (माझं आपलं काहितरीच)
गा.ग.जो. मी कम्युनिस्ट! दशभुजा गणपती तुम्हाला ठाऊक नसताना मी कम्युनिस्ट!
मी. असं तर मग सांगा झोपाळू नरसोबाचं देऊळ कुठे आहे सांगाल (२ कोटी देवात आज मी एक जन्मला)
गा.ग.जो. झोपाळू नरसोबा! प्रथमच ऎकतोय!
मी. जाऊ द्या मी नास्तिकांशी बोलत नसतो. सत्यनारायणाला खारका वाटायला निघालेत (माझाच
डाव उलटून). उद्या गोकुळाष्टमीला केक वाटाल.
गा.ग.जो. हे तुम्ही कुणाला सांगाताहात.
मी. तुमच्या शिवाय दुसरं कोण आहे इकडे? सॉरी, दुसरं कुणी नाही. पूर्णविराम.
गा.ग.जो. आपला कहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही कुठे राहता?
मी. (इथे खरी कसोटी आहे. डीटेलवार पत्ते सांगण्यात आपल्यासारखा हातखंडा कुणाचा नाही) तुम्हाल झोपाळू नरसोबा ठाऊक नाही. रेडेकर तालीम टाऊक असेल...
गा.ग.जो. ती कुठेशी आली?
मी. रविवारात. घाणेकरांच्या कोळशाच्या वखारीला लागून.
गा.ग.जो. काढीन शोधून. घाणेकर तालीम.
मी. घाणेकर तालीम नाही. वखार. त्यालालागून रेडेकर तालीम. रस्ते पाड्यावरनं खाली या सरळ (येथे हवा तसा अर्थ घ्यावा). त्यांना विचारा पापडवाले बेंद्रे कुठे राहतात ते. बेंद्रांच्या वाड्यावरनं गल्ली जाते. तिच्या टोकाला माशेलकर खाणावळ. तिथे वडे चांगले मिळतात. एका वड्याचे ६ पैशे. त्यांना विचारा संपतराव लॉंंड्री. ५ पैशे एका विजारीचे. पुणं भरपूर महाग झालंय हो.
गा.ग.जो. जरा सावकाश सांगा हो. मी लिहून घेतोय. आता कुठे कापडवाल्या बेंद्रांकडे आलोय.
मी. कापडवाल्या बेंद्रे नाही. पापडवाले बेंद्रे. तिथे सोवळ्यातले पापड मिळतात. ४ पैशे एक डझन. आमच्या सौ जास्त चांगले पापड बनवतात पण. बेंद्रांना विचारा माशेलकर खाणावळ व पुढे संपतराव लौंड्री. ते भोरफ्यांचा वाडा दाखवतील.
गा.ग.जो. अहो अहो जरा सावकाश सांगा. माझं लिहून झालं नाहीये.
मी. सावकाश कसं सांगू? बस आली म्हणजे.
गा.ग.जो. ती कशी येणार?
मी. म्हणजे?
गा.ग.जो. हा स्टॉप क्यान्सल झालाय.
मी. काय म्हणता.
गा.ग.जो. हो मग. पंधरा दिवासांपासून हा वनवे झालाय. म्हशींना ही ह्या बाजूने प्रवेश बंद मग बस कशी येईल.
मी. मग मघापसून का नाही सांगितलंत.
गा.ग.जो. अरे व्वा! मग तुम्ही थांबला असतात का? आणि काय हो साहित्यिक असून तुम्हाला गावातले वनवे माहित नाहीत? कमाल आहे! नाव काय तुमचं?
मी. (स्वतःचे नवे बारसे साजरे करत) गोविंद गोपाळ दहिभाते.
गा.ग.जो. आजच हे नाव ऎकतोय.
मी. मी पण! (गा.ग.जो. शुद्धीवर आहेत की बेशुद्ध पडले हे मागे ना पहाता मी सटकतो. काही भोग दैवावर टाकून सुटतच नाही हो.)

- पु.ल.देशपांडे

काही नवीन पण नेहमीचेच

नकार देणे ही कला असेल. पण ,

होकार देऊन काहीच करणे,

ही त्याहून मोठी कला आहे.

==========================

तू झाडावर चढू शकतोस का ?

संजीवनी आणू शकतोस का ?

छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का ?

नाही ना? ... अरे वेड्या ,

फक्त माकडासारखं तोडं असल्यानं कुणी हनुमान होत नाही!!!!

================================================

आपली चूक असताना जो माफी मागतो,

तो प्रामाणिक असतो. आपली चूक आहे की नाही,

याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.

आपली चूक नसतानाही जो माफी मागतो,

तो नवरा असतो!!!

===================================================

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.

तिथे एक शिकारी येतो णि गोळी झाडतो.

एका क्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.

गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.

एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो... ... का? ...

अंगात मस्ती, दुसरं काय?

====================================================

जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे णि प्रत्ये आईपाशी ते असते,

असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा त्तरार्ध माहिती आहे का ?

जगात एकच सर्वात सुंदर बायको असते णि ती प्रत्ये शेजारयापाशी असते!!!!

=============================================================

तुफान पाऊस पडतोय...

तुला वाटत असेल छान बाहेर पडावं

भिजून चिं होत

पाणी उडवत गाणं गाताना

कुणीतरी खास भेटावं... हो ना?

अरे, हो म्हण ना,

लाजायचं काय त्यात?

प्रत्ये बेडकाला असंच वाटतं पावसात!!!

=================================================================

Friday, April 18, 2008

प्रेम प्रकरण

तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा
जमा खर्च एवढा पाहुन जा
तु मला दिलेंल घेऊन जा
मी तुला दिलेंल देऊन जा

स्वीट होममध्ये कित्येकदा खाल्ले
आपण कचोरी सामोसे
आत्ता पर्य़ंत नेहमी मीच भरत आलो
बिलाचे सर्व पैसे
आज अखेरचं जाऊ पोटभर कचोरी खाऊ
किमान या बिलाचे पैसे तरी भरुन जा

लेक्चर बुडवून मी फ़र्स्ट शोचं
एँडव्हान्स बुकिंग करायचो
अन आठवड्यात एक तरी
नाटक किंवा सिनेमा दाखवायचो
नाटकाचे माफ़ करतो
मात्र सिनेमाच्या तिकीटाचे पैसे देऊन जा

आपलं हे प्रेम प्रकरण
तुझ्या पैलवान भावाला कळलं जेव्हा
एवढं बेदम ठोकलं मला
मी मरता मरता वाचलो तेव्हा
चार दिवस दवाखान्यात पंधरा दिवस अंथरुणात पडुन होतो
भावाच्या वतिने तु माझी माफ़ी मागुन जा

मी कुठुन तरी नोट्स मिळवायचो
परीक्षेच्या काळात मात्र तुला द्यायचो
मग तुला नेहमी फ़स्टक्लास मिळायचा
माझा मात्र एक तरी बॅकलाँग रडायचा
आता मात्र आँल क्लिअर व्हायला हवं
म्हणूनच माझ्या नोट्स मला परत देऊन जा

Wednesday, April 16, 2008

फक्त्त एकदाच....तुझ्या डोळ्यात बघाचय

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
आपल्या दोघांची ती
पहीलीच भेट..
तु केसात माळलेल्या
गुलाबाच्या फुलाच ते देठ..

आपल्या दोघांच ते
तासन तास गप्पा मारण...
विषय संपलेला असतांनाही
त्याच्यावरतीच ते कीस पाडण...

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
तु पाडव्याला नेसलेली
ती नऊवारी साडी...
तिथेच तु तुझ्या खिडकीत,
ऊभारलेली ती साखरेची गुढी..

तुझ्या-माझ्यात झालेल
ते पहीलच भांडण...
तुझा राग जाण्यासाठी तुझ्या हाताच
मी घेतलेल ते वरवरच चुंबन...

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
चेह-यावरच तुझ ते
अलगद लाजुन हसण..
आणि लाजता लाजताच हळुच
ते माझ्याकडे बघण....

आपली शेवटची
ती संध्याकाळ...
आपण दोघोच होतो फ़क्त
आणि पुढे तो भयंकर काळ...

कांचाचा ढीग, रक्त्ताचा सडा, तुझी शेवटची आरोळी...
संपलच सगळ एका क्षणार्धात...
मी मात्र वाचलो त्या अपघातात,
तुला मात्र दोन महीने झाले आता..
तशीच निपचित पडुन आहेस तु आयसीयुतल्या त्या खाटेवरती...

म्हणुनच... ऎक ग.. तु जरा माझ..
ऊघडशील ना..... तु तुझे डोळे??
कारण.... एकदाच....
मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...

मुक्त कंठाने रडतो मी ...

रडायचे नाही म्हणुन खुप अड़लो मी
विसरून जाइन तुला समजून किती रडलो मी
का तूला आठवू... हाच विचार करतो मी
अळव्यावरच्या थेम्बा प्रमाने क्षण क्षण मरतो मी

नाही कधी जाणार आपण भेटायचो जिथे
मनात माझ्या रोज ठरवतो मी
तुझी अनुपस्तिथि असल्याने जीवनात
रोज तिथे एकांतात रडतो मी

नको दिसावा तुझा चेहरा
रोज देवास पाया पडतो मी
पाकिटात्ला तुझा फोटो फाड़तान्ना
गलात्ल्या त्या खलीवर रडतो मी

एकपण वस्तु तुझी का ठेवावी जवळ
म्हणुन कपाटातल्या सरव्या वस्तु काढतो मी
प्रत्येक वस्तु एकदा ह्रुदयाला लाउन
मुक्त कंठाने रडतो मी ........

राख माझ्या प्रेताची .........

तुला दिलेली वचनं
मी माझ्या मनापासून पाळले होते...
तू नाही ठेवली किम्मत त्यांची
म्हणुन काल मी माझे प्रेत जाळले होते...

झाली होती गर्दी फार
जळतान्ना मला पहायला...
काही जनांना घाई फार
राख़ नदित वहायला...

आग पूर्ण विझली तरी
प्रेत माझे जळतच होते...
राख़ वेचनार्यांचे काल
हाथ आगिने सलत होते...

राख़ अजूनही गरम होती
'' उद्या वाहू '' म्हणुन गेले...
अश्रु दोन गाळुन
मागच्या मागे वळुन गेले ....

मग... भल्या पहाटे
कुणीतरी तिच्या स्पर्शासम उब देत होत्तं...
मी उठून पाहिले तर
शेजारी एक प्रेत जळत होत्तं...

आलेत मागोमाग राख़ वेचनारे
वेचुन मला त्यांनी घरी नेले...
सोबतच वाहुया आतातरी
अनोळखी कुजबूज करून गेले ...

नदिकाठी आज माझ्या
एक राख़ मडकी होती शेजारी...
माझ्या सारखेच तिचे रूप
जणू काही म्हणत होती बिचारी ...

नदीमधे मग त्यांनी
वाहिली दोन्ही मडकी होती ...
त्या राखेचा स्पर्श होताच कळल
दूसरी राख़ तिची होती ...


अर्चित...

Monday, April 14, 2008

जीवनापासुन या, आता मला मुक्ती मिळावी

पूर्तता मझ्या व्यथेची, माझिया म्रुत्युत व्हावी
जीवनापासुन या, आता मला मुक्ती मिळावी

वेदनेला अंत नाही, अन कुणाला खंत नाही
गांजलेल्या वासनांची बंधने सारी तुटावी

संपली माझी प्रतीक्षा, गोठ्ली माझी अपेक्षा
कापलेले पंख माझे, लोचने आता मिटावी

सोबती काही जीवाचे, मात्र यावे न्यावयाला
तारकांच्या मांडवाखाली, चिता माझी जळावी

काय मी सांगू तुला अन काय मी बोलू तूझ्याशी
राख मी झाल्यावरी, गीते तुला माझी स्मरावी

कवी : सुरेश भट

Friday, April 11, 2008

charolya

मरण दाराशी आल्यावर मी म्हटलं
तुला शंभर वर्ष आयुष्य आहे
मरण ही चाट पडलं म्हणालं
काय हा मनुष्य आहे
======================
इथे प्रत्येकजण आपाआपल्या घरात,
अन प्रत्येकाचं दार बंद आहे
तरी एकोप्यावर बोलणं हा
प्रत्येकाचा छंद आहे
======================
उंच उंच राहून कधी
आभाळही थकतं
आणि कुठेतरी जाऊन मग
जमिनीला टेकतं
========================
तुझं हे नेहमीचं झालंय
आल्या आल्या निघणं
मी जाते, मी निघते म्हणताना
मी थांबवतोय का बघणं

Wednesday, April 9, 2008

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही

आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही
म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई
मुलांनो शिकणे अ, आ, ई

तीच वाढवी ती सांभाळी
ती करी सेवा तीन त्रिकाळी
देवानंतर नमवी मस्तक, आईच्या पायी

कौसल्येविण राम न झाला
देवकीपोटी कृष्ण जन्मला
शिवरायाचे चरित्र घडवी, माय जिजाबाई

नकोस विसरू ऋण आईचे
स्वरूप माउली पुण्याईचे
थोर पुरुष तू ठरून तियेचा, होई उतराई

गीत - ग. दि. माडगूळकर
चित्रपट - वैशाख वणवा

या चिमण्यांनो परत फिरा

या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या

दहा दिशांनी येईल आता, अंधाराला पूर
अशा अवेळी असू नका रे आईपासुन दूर
चुकचुक करिते पाल उगीचच चिंता मज लागल्या

इथे जवळच्या टेकडीवरती, आहो आम्ही आई
अजून आहे उजेड इकडे, दिवसहि सरला नाही
शेळ्या, मेंढ्या अजुन कुठे ग, तळाकडे उतरल्या

अवतीभवती असल्यावाचुन, कोलाहल तुमचा
उरक न होतो आम्हा आमुच्या कधिही कामाचा
या बाळांनो, या रे लौकर, वाटा अंधारल्या

गीत - ग. दि, माडगूळकर
चित्रपट - जिव्हाळा

आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला ?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती, बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई, परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडिल मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्चॉकलेट तर, बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडिल मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी, वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडिल मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर, तिटी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडिल मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणुस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावूनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊनी जाई सावरते ती पदराला !
आवडती रे वडिल मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला !
आवडती रे वडिल मला !
गीत - ग. दि. माडगूळकर
चित्रपट - बोलकी बाहुली

आई

आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी
ती हाक येई कानी, मज होय शोककारी

नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दरी

चारा मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना, ह्या चाटतात गाई
वात्सल्य हे बघुनी, व्याकूळ जीव होई

येशील तू घराला, परतून केधवा गे ?
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे
आई कुणा म्हणू मी, आइ घरी न दारी
स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी


गीत - यशवंत
चित्रपट - श्यामची आई

Tuesday, April 8, 2008

charolya

माळरानावर पाखरं
दाटी दाटीनं जमायाची
बुजगावणी मग वेडी
त्यांच्या संगतीत रमायची
=================
ऐकदा मला ना
तु माझी वाट पहाताना पहायंचय
तेवढ्यासाठी आडोशाला
हळुच लपुन रहायचंय
==================
तु बुडताना मी
तुझ्याकडे धावलो ते
मदतीला नव्हे सोबतीला
नाहीतर ... मलातरी कुठे येतय पोहायला

असं का होत!

काही नाती तुटत नाहीत,
ती आपल्या नकळत मिटून जातात,
जशी बोटांवर रंग ठेवून फ़ुलपाख्ररे हातून सुटून जातात...!